पोलीस पाटील मानधन वाढीचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

धनंजय मुंडे यांची मध्यस्थी : महिनाभराची मुदत

काळगाव – राज्यातील पोलीस पाटलांच्या वाढीव मानधन मागणीचा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर संघटनेच्या शिष्टमंडळाची गृहराज्यमंत्री यांच्यासोबत भेट घालून दिली व याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून एक महिन्यात या प्रकरणी निर्णय घेण्याचे आश्वासन घेतले.

पोलीस पाटलांचे मानधन वाढून मिळावे, यासाठी 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात हजारो पोलीस पाटीलांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांचे एक शिष्टमंडळ धनंजय मुंडेंना भेटले. दरम्यान, मुंडे यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आंदोलनकर्त्यांची भेट घालून दिली.

याच बैठकीत लगेचच केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस पाटीलांचा मानधन वाढीचा प्रश्न एक महिन्यात सोडवू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तत्पूर्वी त्यांनी सभागृहातही हा विषय उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)