पोलीस पाटलावर अखेर गुन्हा

वाघोली- भवरापूर (ता. हवेली) येथील वाळू चोरी प्रकरणी तत्कालीन मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा (दि 21 फेब्रुवारी) दाखल झाला होता. या प्रकरणी शंकर साठे (रा. भवरापूर) यास (दि.19) अटक केली असता तपासाअंती पोलीस पाटील चंद्रकात भीमराव टिळेकर व माजी उपसरपंच दिलीप साठे (रा. भवरापूर) हे ही आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पाटलाच्या ताब्यातील वाहने गायब झाल्याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर 6 पैकी 5 वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. तर, एक वाहन आज अखेर जमा झालेले नाही. विशेष म्हणजे यातील एक वाहन पोलीस पाटील टिळेकर याचेच असल्याचे उघड झाले होते. भवरापूर पोलीस पाटील यांचे बंधू धनंजय टिळेकर यांच्या सहभागाबद्दल त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन अटकही करण्यात आले होते. वाहने गायब होणे, कर्तव्यात कसूर तसेच शासनाचा महसूल बुडवणे आदी कामी पोलीस पाटलावर हवेलीचे नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी ठपका ठेवत पुढील कारवाईसाठी हवेलीच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्याकडे प्रस्ताव पाठवला, त्यानुसार पोलीस पाटील यांचा या वाळू प्रकरणी असणारा सहभाग उघड झाला आहे.

  • पंचनाम्यात आरोपी….
    वाळू चोरी प्रकरणात मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी दि. 19 फेब्रुवारीला केलेल्या पंचनाम्यात वाळू चोरीच्या ठिकाणी रात्री अचानक आलेले भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर हे या गुन्ह्यातील आरोपी निघाले आहेत. मंडल अधिकारी यांनी ताबे पावती करून वाहने पोलीस पाटलाच्या ताब्यात दिली होती. ही वाहने गायब कशी झाली याचे उत्तर आता प्रशासनाला मिळाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)