पोलीस पाटलांना दक्षतेचे धडे!

  • गणेशोत्सव : वादविवाद टाळण्यासाठी गणेश मंडपाजवळ स्वयंसेवक नेमावा

तळेगाव स्टेशन – यंदाचा गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बुधवारी (दि. 5) बैठक घेण्यात आली होती. वादविवाद टाळण्यासाठी उत्सव काळात गणेश मंडपाजवळ स्वयंसेवक नेमावा अशा सूचना पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी यावेळी दिल्या.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात येथे पोलीस परिसरातील सर्व पोलीस पाटील यांनी गणपती उत्सवात घ्यावयाच्या दक्षतेच्या दृष्टीने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी 16 पोलीस पाटील उपस्थित होते.

गणपती उत्सव काळात दिवस-रात्र मंडळापाशी स्वयंसेवक नेमावे, वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नका, मिरवणूक लवकरात लवकर काढावी, त्यामुळे होणारे वादविवाद टाळता येईल, मंडळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयी उपलब्ध करून त्याविषयी मंडळांबरोबर चर्चा करावी, तळेगाव दाभाडे शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने काही प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच गावामध्ये “एक गाव एक गणपती’ योजना राबवावी व जी मंडळे चांगली कामे करतील त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाईल, असेही सांगण्यात आले. त्यावेळी पोलीस नाईक युवराज वाघमारे, सतीश कुदळे, पोलीस शिपाई विठ्ठल वडेकर, प्रशांत वाबळे उपस्थित होते.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक
तळेगाव दाभाडे व परिसरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (दि. 7) रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये 109 नोंदणीकृत गणपती मंडळांचा समावेश झाला आहे. या बैठकीला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)