पोलीस-पाटलांचा आदर्श मुळशी पॅटर्न तयार करा

पिरंगुट- खून, गुन्हेगारी, खंडणी आदी कारणांमुळे सध्या मुळशी पॅटर्न चर्चेत आहे. मात्र, यापुढे मुळशी तालुक्‍यातील पोलीस पाटलांनी चांगल्या आणि योग्य रीतीने काम करून राज्यभरात पोलीस पाटलांचा आदर्श मुळशी पॅटर्न तयार करा, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
पौड (ता. मुळशी) येथे पौड पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त पोलीस अधीक्षक संदीप पाटील आले होते. यावेळी तालुक्‍यातील पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, अनुरुद्ध गिजे, मिलिंद मोहिते, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे तसेच तालुक्‍यातील विविध गावचे पोलीस पाटील आणि महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, मुळशी तालुक्‍यात पोलीस पाटील यांची संघटना आणि महाराष्ट्रातील एकमेव सहकारी पतसंस्था आहे. तसेच दुमजली पोलीस पाटील भवन आहे. पोलीस पाटील हे गावातील विश्वासू असे व्यक्तिमत्त्व असते. या पदाचे महत्व वाढविणे आणि टिकवणे हे पाटीलांच्या हातात आहे. पोलीस पाटलांनी प्रशासनासाठी नि:पक्ष राहून गावात काम करून आपली उपयोगिता सिद्ध केली पाहिजे. पोलीस पाटलांना काम करण्याची चांगली संधी आहे. चांगले काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात येईल.
पुणे जिल्ह्यात पोलीस मनुष्यबळ कमी आहे. जिल्ह्यात वाढणारे औद्योगिकीकरण त्यामुळे वाढते स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. शहरापेक्षा जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद आहे. ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना ओळखपत्र आणि गणवेश देण्यासाठी प्रयत्नशील असून पोलीस पाटील यांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करणार आहे, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले, उपलब्ध मनुष्यबळावर तालुक्‍यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम चांगले आहे. पोलीस पाटील भरती झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात आणखी मदत झाली आहे. पोलीस ठाणे आणि प्रत्येक गावात महिला दक्षता कमिटी कार्यरत आहे. सूत्रसंचालन उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांनी केले. आभार उपनिरीक्षक अनुरुद्ध गिजे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)