पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार यांचे आवाहन

भोर- शहरातील अधिकृत असलेल्या 40 गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकिच्या भावनेतून शहर आणि तालुक्‍यात विधायक उपक्रम हाती घेऊन शहारासह तालुक्‍यात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग सुतार यांनी गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीत केले.
गणेशोत्सव मंगळवार (दि. 13) पासून उत्साहात साजरा करायचा असून शहरातील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात धार्मिक गीतेच लावावीत जेणे करुन उत्सवाचा आनंद सर्वांना मिळेल. कोणीही डींजे डॉल्बीचा वापर करु नये, स्टेज उभारताना वाहतुकीस आडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्‍यक त्या शासकीय विभागाच्या परवानग्या घ्याव्यात, आरास करताना सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करावेत, महिलांच्या सुरक्षेची दक्षता घेण्यात यावी, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गटागटाने मंडळासमोर 24 तास जागृत राहावे, प्रत्येक गणेश मंडळाने अग्निशमन सिंलिडरची व्यवस्था करावी, धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाची गणेशोत्सव काळात परवानगी घ्यावी, अशा सूचना गणेश मंडळांना करुन गणेशोत्सव आवश्‍यक तेथे सीसीटीव्हीची सोय करावी आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीचा बापर करण्यास न्यायालयाचे निर्देशानुसार बंदी असल्याने पारंपारिक खेळांचा आणि वाद्यांचाच वापर करावा, गुलाल व मद्य विरहीत मिरवणुका काढून गणेशोत्सवाचा आनंद लोकाभिमुख करावा, असे आवाहन करुन भोर शहरातील गणेश मंडळांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ठ देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसे दिली जाणार असल्याचेही पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार यांनी जाहीर केले. यावेळी मंडळांना बक्षीसे देताना निकष लावले जावेत, सर्व गणेश मंडळांना मिरवणुकीत खेळण्याची संधी मिळावी, माणाच्या गणपतींचा मान राहिल, असे नियोजन करण्यात यावे अशा मागण्या मंडळांचे पदाधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
यावेळी भोर नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, नगरसेवक गणेश पवार, यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकिचे नियोजन आणि उपाययोजना या विषयीची माहिती यावेळी सहाय्यक उपपोलीस निरीक्षक नंदकुमार तडाखे यांनी दिली. पोलीस जमादार प्रदीप नांदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)