पोलीस-नागरिक संवाद आवश्‍यक!

पिंपरी – देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोविस तास आपले कर्तव्य बजावतात म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असोत की पोलीस त्यांना नागरीकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. पोलीस – नागरीक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्‍यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्‍त केले.

चिंचवड महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस्‌ असोसिएशनच्या वतीने शूरा आम्ही वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खाडे बोलत होते. माजी आमदार दिगंबर भेगडे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, मेजर जनरल (निवृत्त) विजय पवार, शौर्यचक्र विजेते (निवृत्त) कमांडो मधुसुदन सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, प्रभाकर शिंदे, प्रफुल्ल कदम, कल्याण पवार, निवृत्त सहायक पोलीस आयुक्‍त मनोहर जोशी, नगरसेवक माऊली थोरात, अनुराधा गोरखे, हवेली तालुका पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, कांतीलाल काळोखे, विंग कमांडर निवृत्त शशिकांत ओक आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती सेवापदक विजेते मे.ज.(निवृत्त) विजय पवार, शौर्य पदक विजेते (निवृत्त) कमांडो मधुसुदन सुर्वे, विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक, सैन्य दलात सेवा केलेले पिता – पुत्र मधुकर सरोते, संतोष सरोते, विरपत्नी पुरस्कार सोनाली फराटे यांना संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महादेव भुजबळ, प्राजक्‍ता भोसले (क्रीडा भूषण), निलेश मरळ (कार्यगौरव), प्रदीप वाल्हेकर, सत्यनजी भास्कर (समाजभूषण), संदीप राऊत, मयुर तिलवानी (उद्योगरत्न), ऍड. राजेंद्र मुथा, महादेव (तात्यासाहेब) गुंजाळ (शिक्षण महर्षी), तानाजी राऊत (कृषीरत्न) हेमलता काळोखे आणि कांतीलाल काळोखे यांचाही गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाने पोलिसांसाठी भूखंड आरक्षित करुन त्याठिकाणी घरकुल सारखा प्रकल्प राबवावा, अशी मागणी यावेळी केली. हरिष मोरे, अतुल राऊत, प्रताप भोसले, तेजस खेडेकर, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, सुभाष मालुसरे, अक्षय पवार यांनी संयोजनात सहभाग घेतला. आभार गोपाल बिरारी यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)