पोलीस दलाचा प्रभाव वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नागपूर : पोलीस दलाचा प्रभाव आणि परिणामकारकता वाढविण्यासोबतच गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व तंत्रज्ञान पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक सीसीटीएनएस सुविधा पूर्ण करुन नागरिकांना ई-तक्रार नोंदणीची सुविधा सुरु करणारे पहिले राज्य ठरले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सुसज्ज अशा पोलीस भवनाचे भुमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन गुन्हेगार शोधण्यासाठी क्राईम ॲन्ड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क ॲन्ड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरु आहे. तसेच जनतेला घरी बसून आपली तक्रार नोंदविता यावी यासाठी ई-तक्रार नोंदविण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. जनतेला जलद आणि परिणामकारक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पासपोर्ट तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आल्यामुळे ही सेवा चोवीस तासात उपलब्ध होण्यास मदत झाली आहे असे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ प्रत्येक चौकात वाहतुकीवर नियत्रंण ठेवित आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. वाहतुकीचे पालन न करणाऱ्यांना मुंबई शहरात पाच लाख जणांना ई-चालन घरी पोहोचविण्यात आले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)