पोलीस तक्रारीची धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा

पिंपरी – डॉक्‍टरांच्या चिठ्‌ठीशिवाय औषध दिल्याने एक मुलगी आजारी पडल्याच्या कारणावरुन काळेवाडी येथी एका औषध विक्रेत्याला फोनवरुन पोलीस तक्रार करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी किरण रमेश निकम (वय-32, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुजारी (पूर्णनाव माहीत नाही. रा. नवी मुंबई) नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना बुधवारी (दि. 12) दुपारी तीनच्या सुमारास निकम यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन आरोपी पुजारी नामक इसमाने, मी नवी मुंबई येथून बोलत आहे. तुम्ही एका मुलीला डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याने ती मुलगी आजारी पडली आहे. तिच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुम्ही जर तिच्या रुग्णालयाचा खर्च केला नाही. तर मी तुमच्या विरोधात काळेवाडी आणि नवी मुंबई येथील पोलिसांत तक्रार दाखल करेन, अशी धमकी दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)