पोलीस ठाण्यालगतच दोन तास धुमाकुळ

वडगाव निंबाळकरमधील घटना : परिसरातील सात घरफोडले

सोमेश्‍वरनगर- बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे लगत सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत धुमाकुळ घातला. शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री एकपासूनन सुमारे दोन तास हा धुमाकुळ सुरूच होता. दरम्यान, एका नागरिकाने रक्षणासाठी हवेत गोळीबार करूनही चोरट्यांनी शेजारचे घर फोडले. तर नागरिकांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी पळ काढला.
नीरा-बारामती मार्गलगत सदोबाचीवाडी गावच्या हद्दीतील सणस वाड्यात चोरटे शिरले. वाड्यातील खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या. आरडा ओरडा करूनही चोर जात नव्हते. तर सुधीर सणस माडीवर गेले व येथुन हवेत बंदुकीतून गोळीबार केल्यावर चोरटे पळाले. जाताना शेजारील अभिजित मनोहर फराटे यांचे घर फोडले. बाजुच्या खोल्यांना बाहेरून कडी लाऊन बंद खोलीचे कुलुप तोडुन साड्यांसह बारा हजारांचा ऐवज नेला.
सुदाम खंडेराव फराटे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला पण काहीच मिळाले नाही. वसंत होळकर यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटातील साड्या तीन हजार रोख रक्कम नेली. इतर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. पण ऐवज गेला नसल्याने पुढे कोणी आले नाही. शिवाजी देवकर यांच्या सलुन दुकानचे कुलुप तोडले येथे काही मिळाले नाही. लगतचे महंम्मद दिलावर भालदार यांचे जनरल स्टोअर्स दुकान उघडून चोरटे आत गेले. यावेळी भालदार कुटुंब जागे झाले. महम्मंद पत्नीसह बाहेर आले व आरडा ओरडा केल्याने मुलगा फिरोज आणि आदम यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर पोलीस ठाण्याच्या दारातून चोरटे अंधारात पळाले. पाठलाग केल्याने चोरट्यांनी चोरलेला गल्ला जागीच टाकला. दरम्यानच्या काळात पोलीस ठाण्यामधे फोन लाउनही फोन लागला नाही. तर जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना घडला प्रकार सांगितला. पोलीस ठाणे परिसरातच चोरट्यांचा दोन तास धुमाकुळ सुरू होता. तर बंटी सणस यांनी शंभर नंबरला फोन लाउनही प्रतिसाद आला नाही.स्थानिक पोलिसांनी तत्परता दाखवली नाही. तर दुपारी बारापर्यंत चोरी झालेल्या ठिकाणी भेटीसुद्धा दिल्या नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. चोरीची तक्रार एकत्र घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)