पोलीस ठाण्यात बीट मार्शल व दामिनी पथकांचे उद्‌घाटन

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दोन बीट मार्शल, एक दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले. बीट मार्शल व दामिनी पथकाचे उद्‌घाटन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, उपनिरीक्षक प्रकाश शितोळे उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेली वाहने व साहित्य या पथकांकडे सुपूर्द करण्यात आली. बीट मार्शल हे शहरात दुचाकीवरून गस्त घालणार असून शहरात कोठेही काहीही घटना घडल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहचून संबंधितांना मदत करणार आहे. दामिनी पथक हे महिलांचे प्रश्‍न, समस्यांचे निराकरण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)