पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड

नारायणगाव- नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीनिमित्त एकता दौडमध्ये पुरुष गटात ज्ञानेश्वर चंद्रशेखर गौडगुंड आणिशुभांगी दरवडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाणाच्या हद्दीमधील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत पुरुष आणि महिला गटातील सर्वांसाठी खुल्या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये नारायणगाव पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक अशा 200 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.लहु राजु केसकर यांनी या दौडमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक भिवा बिरु झिटे यांनी मिळविला, तसेच महिला गटामध्ये महिला पोलीस कॉस्टेबल शुभांगी दरवडे प्रथम क्रमांक, रेखा गुंजाळ, पोलीस पाटील नगदवाडी – द्वितीय क्रमांक आणि प्रियंका रामचंद्र भोसले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्यांना अजय गोरड यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन एच. पी. नरसुडे यांनी केले. माउली खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. आभार पोलीस उपनिरीक्षक राहुल गोंधे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)