पुणे- पोलीच चौकीत तक्रार घेण्यासाठी पोलीस नसल्याने वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगर पोलीस चौकीत तोडफोड केल्याप्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली. त्या दोघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर न्यायालायने दोघांना जामीन मंजूर केला.
विठ्ठल सदाशिव पडवळ (वय 23, रा. नऱ्हेगाव) आणि जेन्स उर्फ जाम्या संजय वाघमारे (वय 22, रा. आनंदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामनगर परिसरात दोन गटामध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे जण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रामनगर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी पेट्रोलींगसाठी बाहेर गेले होते. दोघांना तक्रार द्यायची होती. मात्र, तेथे कोणीच नसल्याने वैतागून त्यातील एकाने चौकीतील टेबलवरील कांचाचे नुकसान केले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना जामीन मंजुर केला. सरकारी पक्षाच्या वतीने एस. के. पाचारणे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)