पोलीस चौकीत तरुणाचा गोंधळ

पिंपरी – “रॉंग साईड’ने आलेल्या दुचाकीस्वाराने पोलीस चौकीत गोंधळ घालत थेट पोलीस उपनिरीक्षकाच्याच अंगावर धावून जात पोलिसांनाच दम दिला. ही घटना हिंजवडी येथे सोमवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजता घडली.

केतन माधव गावंडे (वय-30, रा.मनपाडा, ठाणे) असे दुचाकीस्वार तरुणाचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नंदराज तुकाराम गभाले यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, हिंजवडी येथे कारवाई सुरू असताना केतन हा “रॉंग साईड’ने गाडी चालवत होता. त्याला अडवले असता त्याने हुज्जत घालायला सुरूवात केली.

त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीसह पोलीस चौकीत आणले. यावेळी त्याने पोलीस चौकीत गोंधळ घातला. थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावत जाऊन त्याने, “”तुम्ही खाकीवाले माझे काही नाही बिघडवू शकत नाही”, असे म्हणत पोलिसांनाच दम दिला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)