पोलीस गेले समन्स घेऊन; वसूल केले 2 लाख 71 हजार

वाहतूक नियमांचे उल्लंघन ; ई – चलन व सीसीटीव्हीव्दारे कारवाई

पुणे – वाहतुकीच्या नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलन व सीसीटीव्हीव्दारे कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये वारंवार वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी घरी जाऊन समन्स बजावले. यांनतर त्यांच्याकडून 2 लाख 71 हजार 350 रुपये दंड वसूल करण्यास आला.

-Ads-

यासाठी पोलिसांनी 200 वाहनचालकांची यादी तयार केली होती. त्यापैकी 97 जणांविरुद्ध समन्स बजावले गेले. उर्वरित वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन दंड वसूल करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे सर्व प्रभारी अधिकारी व उपायुक्‍त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तरी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)