पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सणस ग्राऊंडवर पोलीस अकादमीत कामाला असलेल्या एका तरुणीने फिर्याद दिली आहे.
कृष्णा जयराम फुले(24,रा.शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) असे आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना ऑगस्ट 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील अश्‍विनी लॉज येथे घडली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. मात्र तीच्याशी विवाहास नकार दिला. तीने विवाह करण्याचा तगादा लावला असता तीला शिवीगाळ व हाताने मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्हि.ए.भोसले तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)