पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली कार

पुणे,दि.12- वाहन परवाना मागितल्याने तसेच गाडीच्या काळ्या काचेबाबत विचारणा केल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्यात आली. यामध्ये गाडीची धडक लागून वाहतूक पोलीस जखमी झाला आहे. ही घटना कोरेगाव पार्क जंक्‍शन येथे मोरओढा चौकात घडली. याप्रकरणी दोन महिलांसा एका चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पांडुरंग पवार हे कोरेगाव पार्क वाहतुक शाकेत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते शनिवारी दुपारी पोलीस हवालदार पावसकर व पोलीस शिपाई शेख यांच्या समवेत वाहतूक नियमन करत होते. यावेळी त्यांनी तेथून जाणाऱ्या कार चालकाला थांबवले. त्याला वाहन परवाना आणी गाडीला लावलेल्या काळ्या काचेबद्दल विचारणा केली. यामुळे वाहनचालकाने फिर्यादीबरोबर वाद घातला. हा वाद सुरु असतानाच कार मधील दोन महिला बाहेर आल्या. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन धक्का-बुक्की केली. तसेच पोलीस शिपाई शेख यांच्या अंगावर धाऊन जाऊन त्याच्या शर्ट ओढला. यानंतर ते सर्व जण कारमध्ये बसले. शेख यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, कार चालकाने त्यांना धडक देऊन पळ काढला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अरुण गौड यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)