पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

न्यायालयात पुरावे सादर न करता आरोपींना मदत केल्याचा ठपका ; पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली फिर्याद

श्रीगोंदे: 2009 ते 2011 या कालावधीत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर असलेले अनिल जाधव (रा. नांदेड) यांच्यावर त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अकरा गुन्ह्यांमध्ये आरोपींना मदत करीत कागदपत्रे व पुरावे न्यायालयात सादर न केल्यामुळे त्यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सोमवारी (दि.7) रात्री या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत पोलीस निरीक्षक जाधव यांनी म्हटले आहे की, तत्कालीन उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्याकडे 2009-2011 या दोन वर्षांत दाखल झालेले जे अकरा गुन्हे तपासासाठी होते, त्या गुन्ह्यांतील पुरावे जमा करुन त्याचा अंतीम अहवाल न्यायालयात सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या गुन्ह्यांत सरकारी कामांत अडथळा, अपघात, अकस्मिक मृत्यू, दारूबंदी, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

तथापि उपनिरीक्षक जाधव यांनी सदर गुन्ह्यांची कुठलीच कागदपत्रे, पुरावे न्यायालयात जमा केले नाहीत. या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षेपासून वाचविण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा दिलेल्या आदेशांचा अवमान असून, कर्तव्यात टाळाटाळ आहे. सदर गुन्ह्यांचा तपास असताना त्यांची बदली झाली, तरी त्यांनी यातील कुठल्याही गुन्ह्यातील कागदपत्रे पोलीस ठाण्याच्या अभिलेख कक्षात जमा केलेली नाहीत. त्यामुळे उपनिरीक्षक जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावे, असे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी फिर्यादित म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)