पोलीस आयुक्‍तालय स्वातंत्र्य दिनापासूनच

पिंपरी – बहुप्रतिक्षीत असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट पासूनच सुरु होणार आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या गृहविभागाने शुक्रवारी (दि. 10) “नोटिफिकेशन’ काढून शिक्कामोर्तब केली आहे.

शासनाने 28 मे रोजी काढलेल्या अध्यादेशाव्दारे पोलीस आयुक्त पुणे शहर आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड महापालिका व परिसरासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात आले आहे. या आयुक्तालयाचे प्रत्यक्ष कामकाज येत्या बुधवार (15 ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे.

-Ads-

सुरुवातीला आयुक्तालयाचे काम हे ऑटो क्‍लस्टर येथून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन व अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे हे शहरात फिरून जातीने कामाची पाहणी करत आहेत. पोलीस आयुक्तालयाचा विस्तार पाहता ग्रामीण व शहर यांचा समन्वय साधून आयुक्तालयाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे कामकाजही 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यात शासनाने हा अध्यादेश काढल्यामुळे आयुक्तालयाच्या कामाला गती मिळणार आहे. शहरासाठी 2010 सालापासून आयुक्तालयाची मागणी करण्यात येत होती. अखेर हे आयुक्तालय येत्या स्वातंत्र्य दिनापासून खऱ्या अर्थाने सुरु होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)