पोलीस आयुक्‍तालयाला 100 टक्‍के सुविधा अशक्‍य!

पिंपरी – पोलीस आयुक्तालयाला सर्व सुविधा देण्यासाठी मंत्री मंडळ व महासंचालकांसमवेत बैठका झाल्या आहेत. मात्र तूर्तास 100 टक्के मदत करणे शक्‍य नाही, असे स्पष्ट मत पालक मंत्री बापट यांनी व्यक्त केले.

चिखली पोलीस ठाण्याचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन,महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अप्पर आयुक मकरंद रानडे आदी उपस्थित होते.

-Ads-

बापट म्हणाले की, आयुक्तालयासाठी सुविधा अपुऱ्या आहेत. हे सत्य असले तरी काही महिन्यात ही परिस्थिती बदलेल. मात्र नागरिकांनी पोलिसांना मदत करावी जेणेकरून 50 टक्के गुन्हे रोखाने शक्‍य होईल. पायात पाय घालून अडवणूक करू नका, तर हातात घालून काम करा तरच गुन्हे रोखणे शक्‍य आहे. पोलिसांना मित्र समजा त्यांचा आदर राखा तरच त्यांना काम करणे सोपे जाणार आहे, असेही ते म्हणाले.

आयुक्त पद्मनाभन म्हणाले की, आयुक्तालयासमोर अनेक अडचणी असल्या तरी आहे त्या मनुष्यबळात आम्ही संख्यात्मक प्रगती करणार नाही. तर गुणात्मक प्रगती करु असा विश्‍वास व्यक्त केला. आम्ही कायम सकारात्मक काम करु. नागरिकांनी आमच्यापर्यंत नाही तर आम्ही नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या काही महिन्यात सर्वांनाच फरक जाणवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

“कासारसाई’प्रकरणावर बोलणे टाळले
कासारसाई प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांना भेटण्यासाठी अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली. खासदार प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भेट दिली. मात्र, जिल्ह्याचे पालक मंत्री असूनही गिरीष बापट अद्यापही घटनास्थळी गेले नाहीत अथवा पीडितेच्या कुटुंबियांची चर्चा केली नाही. तसेच तपासाचा आढावा देखील घेतला नाही. याबाबत बापट यांना पत्रकारांनी विचारले असता “”ही वेळ या विषयावर बोलण्याची नाही”, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या संवेदनशील प्रकरणाला सोयीस्कररित्या बगल दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)