पोलीस आयुक्‍तालयाच्या प्रस्तावात असंख्य त्रुटी

पिंपरी – मनुष्यबळ व गाड्या यांच्या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात असंख्य त्रुटी असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश पोलीस महासंचालकांच्या बैठकीत देण्यात आला आहे.

मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात पार पडली. यावेळी राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक परबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त महासंचालक धनंजय कमलाकर, अस्थापना विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पुणे शहर सहआयुक्त शिवाजी बोडखे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील हे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैठकीत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. ज्या प्रस्तावावरून मनुष्यबळ-वाहने दिली गेली. त्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी असल्याचे यावेळी बोलले गेले. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर आणि नव्याने जोडल्या गेलेल्या ग्रामीण पोलिस दलातील पाच पोलिस ठाण्यांच्या भागासाठी आवश्‍यक मनुष्यबळ-वाहनांच्या गरजेनुसार नवा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पिंपरी-चिंचवडसाठी नव्याने पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी अन्य जिल्ह्यातून शहरात येण्यासाठी इच्छुक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची तयारी याबैठकीत दर्शविण्यात आली. या बैठकीत चर्चिल्या गेलेल्या मुद्यांवर अंतिम निर्णय होण्यापूर्वी पुन्हा एकदा एक बैठक होणार असून, दोन्ही अहवालांवर अंतिम तोडगा येत्या काही दिवसांत काढला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

शहर-ग्रामीणची हद्द विभाजन करताना तेथे असलेल्या मनुष्यबळ-वाहने यांचे विभाजन योग्य प्रकारे झाले नाही. आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार करताना झालेल्या त्रुटींचाच आधार घेऊन पुणे शहर-ग्रामीण पोलीस प्रमुखांनी पिंपरी-चिंचवडसाठी मनुष्यबळ आणि वाहने दिली. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश वाहने ही काम चलावू असल्याचे अवघ्या चार महिन्यांत उघड झाले. यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)