पोलीस आयुक्‍तालयाचे 95 टक्‍के काम पूर्ण

पिंपरी – चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे सुरू असलेल्या पोलीस आयुक्‍तालयाच्या इमारतीचे काम 95 टक्‍के पुर्ण झाले आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली.

यावेळी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.

-Ads-

याबाबत माहिती देताना एकनाथ पवार म्हणाले की, आयुक्तालयाची इमारत ही शेवटच्या टप्प्यात असून तेथे लाईट, फर्निचर यांचेही काम झाले असून तेथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा नामफलक देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ काही छोटी कामे राहिले आहेत. ते देखील आठ दिवसांत पूर्ण होणार असून येत्या 10 डिसेंबरपर्यंत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ज्यामुळे ते त्यांची पूर्ण यंत्रणा तेथे स्थलांतरीत करु शकतील. तुर्तास उद्‌घाटनाचा मुहूर्त ठरलेला नाही. मात्र 10 डिसेंबरनंतर त्याचेही नियोजन होईल व त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ देखील घेतली जाईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

आयुक्तालयाचे तुर्तास कामकाज हे महापालिकेच्या चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरच्या इमारतीतून सुरु आहे. मात्र आयुक्तालयाचा वाढता व्याप पाहता ती इमारत देखील आयुक्तालयासाठी अपुरी पडत आहे. तेथे भेटीसाठी येणारे नागरिक, फर्निचर तसेच उपस्थितांच्या गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुळ जागेत आयुक्तालय सुरू झाल्यानंतर हा प्रश्‍न सुटणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)