पोलीस आयुक्‍तालयाचे उद्‌घाटन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे औपचारिक उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालक मंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व सामान्यपणे आयुक्तालयाचे कामकाजाचे मुल्यमापन हे आपण गुन्ह्यांच्या संख्ये वरून मोजतो. मात्र हे मुल्यमापन गुन्ह्यांच्या संख्येवरून नाही तर ते गुनह्यांची उकल, अटक आरोपींची संख्या यावरून केले जावे कराण गेल्या चार वर्षात आरोपी अटक करणे व गुन्हे सिद्ध करण्याचा संपूर्ण राज्याचा रेषो वाढला असून तो 50 टक्‍क्‍यांवर गेला आहे. हाच रेषो अजून वाढावा व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयामुळे नागरिकांना शहरात सुरक्षीत वाटावे यासाठी पोलिसांनी पोलिसींग वाढवावी.

आयुक्तांनी नागरिकांच्या मनापर्यंत पोहचून त्यांना काय हवे त्यानुसार शहरात उपक्रम राबवावेत. जेणे करून पोलिसांचा धाक नाही तर आधार त्यांना वाटला पाहिजे. तसेच आयुक्तालयाच्या विविध मागण्यांसाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून लवकरच सरंव मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांकडून आयुक्‍तालयाची पाहणी
ऑटो क्‍लस्टर येथून 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. महापालिका पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून चिंचवड मधील प्रेमलोकपार्क येथे पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली. या इमारतीची डागडुजी करून 1 जानेवारी 2019 पासून आयुक्तालयाच्या कारभार नवीन स्वतंत्र इमारतीमधून सुरु झाला. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारतीच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उद्‌घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी औपचारिक उद्‌घाटन झाल्यानंतर आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील विविध शाखा, नियंत्रण कक्षाच्या पाहणीनंतर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आयुक्तालयाच्या कार्यान्वयासाठी येणाऱ्या अडचणी व गरजा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)