पोलीस आयुक्‍तालयाचा मार्ग मोकळा

आमदार चाबुकस्वार : विधानसभेत दिली माहिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव संमत होऊन आयुक्तालयाचे कामकाज लवकरच सुरु होण्याबाबत गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवल्याने आयुक्‍तालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार गौतम चाबुकस्वार यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. वाढती गुन्हेगारी व नियंत्रणाच्या बाहेर गेलेली कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय कधी सुरु होणार असा प्रश्‍न आमदार चाबुकस्वार यांनी मांडला. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या पुढे असून, गेल्या दीड वर्षापासून आयुक्‍तालय रखडले असल्याचे सांगितले.

त्या प्रश्‍नावर गृहराज्य मंत्री पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचे भौगालिक महत्त्व, लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षण संस्था, वाहनांची संख्या यात वाढ झाल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. गुन्हेगारांवर परिणामकारक व प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी 2015 मध्ये पोलीस महासंचाकांनीच आमदार चाबुकस्वार यांच्या मागणीनुसार शहरात पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याबाबत प्रस्ताव शासनाला सादर केला होता. मात्र, नवीन आयुक्तालयासाठी 5 नोव्हेंबर 2016 तत्कालीन अप्पर मुख्य सचिव यांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्यास महासंचालकांना कळवले. त्यानुसार राज्य पोलीस दलातील रिक्त पदांमधूनच पोलीस आयुक्तालय होऊ शकेल व त्यास मान्यता मिळावी, अशी विनंती अर्थ खात्यास करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)