पोलीस आयुक्तालयातच पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चौघांना चावा

त्या कुत्र्याला पकडण्यात यश


जखमींवर ससूनमध्ये करण्यात आले उपचार

पुणे – चक्क पोलीस आयुक्तालयतच घुसून पिसाळलेल्या कुत्र्याने पोलीस अधिकाऱ्यासह चौघांना चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरूवारी दुपारी झालेल्या या घटनेत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक, शाळेचा सुरक्षा रक्षक आणि कामानिमित्त आयुक्तालयात आलेले शहरातील पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी असे चौघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्वरित कुत्र्याला पकडून नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा पोलीस आयुक्तालयात फिरत होता.
दुसरीकडे आयुक्तालयात भटक्‍या कुत्र्यांचाहा मोठ्या प्रमाणात वावर असून, या कुत्र्यांच्या कळवंडहीमुळे बुधवारीच आयुक्तालयात याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. त्यातही कॅन्टीनचा परिसरात ही कुत्री भटकातात. अनेकांकडून या भटक्‍या कुत्र्यांना खायाला दिले जाते. त्यामुळे या भटक्‍या कुत्र्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा आयुक्तालयात फिरत होता. त्यावेळी आयुक्तालयातील पुर्वीच्या आणि या कुत्र्यांमध्ये जोरदार कळवंडही झाल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांनीच या कळवंडही सोडविल्या होत्या. त्यावेळी ही भटकी कुत्री चावतील, अशी चर्चाही झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरूवारी हा प्रकार घडला आहे. पिसाळलेल्या या कुत्र्यांने गुरूवारी दुपारी आयुक्तालया शेजारील एका शाळेच्या कर्मचाऱ्याला चावा घेतला. त्यानंतर तो आयुक्तालयात घुसला. त्यानंतर आयुक्तालयाच्या कॅंन्टिन आणि परिसरात उभारलेल्या पोलिसांना चावा घेत सुटला. यामध्ये दोन कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा त्यांने चावा घेतला. या घटनेनंतर आयुक्तालयाच एकच धुमाकूळ उडाला. तत्काळ याची माहिती भटकी कुत्री पकडणाऱ्यांना देण्यात आली.त्यानंतर या कामगारांनी आयुक्तालयात धाव घेतली. अनेक प्रयत्न केल्यानंतर या कुत्र्याला पकडण्यात आले. त्यानंतरच आयुक्तालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. दरम्यान कुत्र्याने चावा घेतलेल्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)