पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक

पिंपरी,  (प्रतिनिधी) – पोलीस असल्याची बतावणी करून एकाची 31 हजाराची फसवणूक केली. गणेशनगर, बोपखेल येथे गुरुवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.

सुकुमार मोटे (वय-38, रा. भिलारेवाडी, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी क्रमांक नसलेल्या दुचाकीवरील 30 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे हे देवकर एजन्सी येथून पायी जात होते.

त्या वेळी दुचाकीवर एकजण तेथे आला. पोलीस असल्याची बतावणी करून सुट्ट्या पैशाबाबत मोटे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार त्यांच्याकडील 31 हजार 500 रुपयांची रोकड घेतली. मात्र, हातचलाखीने मोटे यांना दिलेल्या नोटा पुन्हा काढून घेऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कांबळे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)