पोलीस असलेल्या वडील, दोन भावांच्या मदतीने बलात्कार

पुणे- सहायक पोलीस फौजदार वडील, दोन पोलीस भावांच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.

अमोल धनू चव्हाण (वय 22, रा. नळदुर्ग, ता. जि. उस्मानाबाद) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात त्याचे वडील धनू निलप्पा चव्हाण, भाऊ सुहास आणि सुधाकर या तिघांवर गुन्हा दाखल आहे. तिघांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला आहे. ही घटना 21 मे रोजी येवलेवाडी, कोंढवा आणि शिरूर तालुक्‍यातील कारेगाव येथे घडली होती. पीडित 16 वर्षीय मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद देण्यात आली होती.

पीडित मुलगी शिरूर येथील पाचंगे वस्ती येथे तिच्या नातेवाईकांना मिळून आली. त्यावेळी अमोल याने तिला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. तिचे पूर्वी अमोलसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याचे एएसआय वडील, दोन पोलीस भावांनी कारमधून दमदाटी करून तिला पळवून नेले. अमोल याच्यासोबत खोलीमध्ये ठेवले. तिथे लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात अमोल याच्यावर भारतीय दंड संहिता 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला या कृत्यासाठी मदत केल्याप्रकरणी एएसआय वडील, दोन पोलीस भावांविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी अमोल याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. पुराव्यावरून त्याने प्रथमदर्शनी हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे.

त्याने तिला पाच महिने डांबून ठेवले होते. त्याच्या कुंटुबात तीघे पोलीस आहेत. त्याला जामीन मिळाल्यास सर्वजन मिळून पीडित मुलगी, तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने अमोल याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)