पोलीस अधीक्षक शर्मा यांनी घडवले माणुसकीचे दर्शन 

कार्यालयाबाहेर येऊन स्वीकारले दिव्यांगांचे निवेदन; दिव्यांगांसाठी आश्‍चर्यजनक होते
नगर – दिव्यांग व्यक्तींना दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयापर्यंत येण्यासाठी असलेली अडचण लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतःच्या कक्षात न थांबता कार्यालयाच्या दरवाजात जाऊन दिव्यांगांचे निवेदन स्वीकारले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यातील माणुसकीचे दर्शन घडविणारी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संवेदनशील कृतीतून घडवलेले दर्शन दिव्यांगांसाठी आश्‍चर्यजनक होते.
दी राईट्‌स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी केंद्र सरकारने पारित केलेल्या 2016 कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन घेऊन आलेल्या दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी थेट आपल्या कार्यालयाच्या दरवाजात भेट घेऊन निवेदन स्वीकारले. कुठेच न्याय मिळाला नाही की, जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे न्याय मिळेल या अपेक्षेने अर्ज-निवेदनाद्वारे दाद मागितली जाते. सार्वजनिक योजना, सरकारी कामात होणारी दिरंगाई अशा सामाजिक स्तरावरील अडचणींपासून व्यक्तिगत पातळीवरील तक्रारी या निवेदनामध्ये असतात. निवेदनाचे अर्ज घेऊन जिल्हाधिकारी-जिल्हा पोलीसप्रमुखांकडे येणारी शिष्टमंडळे हे चित्र नेहमीच आढळते. नित्याच्या कामकाजाचे अवधान सांभाळून हे वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारतात. निवेदनकर्त्यांची मागणी सरकार दरबारी कळविण्यासोबतच आपल्या अखत्यारित असलेल्या मुद्‌द्‌यांबाबत संबंधित विभागास निर्देश देतात.
केंद्र सरकारने पारित केलेल्या दी राईट्‌स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी कायदा 2016 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या हेतूने प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या कार्यालयात पोहोचले. यात जिल्हा अपंग पुनर्वसन कमिटीचे सदस्य शंकरराव शेळके, विजय हजारे, सय्यद गजाला, सोमनाथ पवार, अमित आंबेकर, भरत जोशी, शीतल गुंदेचा, हिराताई कानडे यांचा समावेश होता. तत्पूर्वी पोकळे यांनी पोलीस अधीक्षक शर्मा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. या मागणीचे निवेदन घेऊन दिव्यांग शिष्टमंडळ आले असल्याची माहिती पोकळे यांनी एसपी शर्मा यांना दिली. दिव्यांगांचे सर्वच प्रतिनिधी जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कक्षात पोहोचणे शक्‍य नव्हते. दिव्यांग बांधवांची अडचण लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शर्मा यांनी निवेदन देण्यासाठी कक्षात येण्याची गरज नाही, आपण स्वतःच कार्यालयाच्या दरवाजात येऊन निवेदन
स्वीकारू, असे सांगून पोकळे यांच्या समवेत आपला कक्ष सोडला.
चौकट…
दिव्यांग बांधवांना झाला अवर्णनीय आनंद
दिव्यांग प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले. आपल्यापर्यंत येऊन स्वतः पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारले याचा अवर्णनीय आनंद दिव्यांग बांधवांना झाला नसेल तरंच नवल! आपल्या या सहज कृतीतून पोलीस अधीक्षकांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यातील माणुसकीचे घडवलेले दर्शन दिव्यांगांसाठी आश्‍चर्यजनक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)