पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे

सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
नवी दिल्ली – पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी खडसावले. पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेचे चित्रण मी पाहिले. तपासाच्या आताच्या टप्प्यावर न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी ध्वनित केले. तसे म्हणण्याचे आणि न्यायाधीशांची नालस्ती करण्याचे त्यांचे काम नाही. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. प्रकरण आमच्यापुढे आहे.

सर्वोच्च न्यायालय चुकीचे आहे असे पोलीस अधिकाऱ्यांकडून ऐकण्याची आमची इच्छा नाही, अशी संतप्त टिप्पणी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)