पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पिंपरी – पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि. 28) पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दोन उपायुक्त, पाच पोलीस निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एका फौजदाराची बदली केली. या तडकाफडकी बदल्यांमुळे बस्थान बसविण्याच्या प्रयत्नात असलेले पोलीस अधिकारी चांगलेच हादरले आहेत.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 18 पासून कार्यान्वित झाले. अपुरे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, वाढती गुन्हेगारी यामुळे अल्पावधीतच पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यात आता अदल्याबदल्यांची भर पडली आहे. यापुर्वी तीन वेळा पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अवघ्या 4 महिन्यात 4 वेळा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पोलीस वर्तुळामध्ये बहारदार चर्चा रंगल्या आहेत. सांगवी पोलीस ठाण्यातील दोन निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि एका फौजदाराची बदली झाल्याने शुद्धीकरण मोहिमेची वदंता आहे. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे कागदोपत्री म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस उपायुक्त (परिमंडळ – 2) नम्रता पाटील यांची बदली मुख्यालयात तर, त्यांच्या जागी मुख्यालयातील उपायुक्त विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

निगडीचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे यांची बदली चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी तर त्यांच्या जागी देहूरोडचे निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे यांना पाठविण्यात आले आहे. सांगवीचे निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांची बदली नियंत्रण कक्षात झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक योगेश आव्हाड यांची बदली विशेष शाखेत, सांगवीचे सहायक निरीक्षक खताळ यांची बदली दिघी पोलीस ठाण्यात तर सांगवीचे फौजदार महेंद्र आहेर यांची बदली हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)