पोलिस 50 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

पुणे,दि. 6- शिक्रापुर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 50 हजार रूपयाची लाच घेताना लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस हवालदार दत्तात्रय विष्णु होले (53, बक्‍कल नं. 829, शिक्रापुर पोलिस स्टेशन) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. होले हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापुर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा करुन कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदारास सीआरपीसी 156 (3) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी न करता साक्षीदार बनविण्यासाठी पोलिस हवालदार दत्तात्रय होले यांनी शनिवारी (दि.6 ऑक्‍टोबर) रोजी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार आणि पोलिस हवालदार होले यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेताना होले यांना पकडण्यात आले. अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाच लूचपत प्रतिमंधक विभागाच्या टोल फी क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन उप अधिक्षक सुहास नाडगौंडा यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)