पोलिस मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणुन सरडे येथील एकाने जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी नितीन बळीराम विरकर रा. सरडे ता. फलटण याच्या विरोधात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन विरकर यांनी गावातील एका भिशीत पैसे गुंतवले होते. ती भिशी रामदास शेडगे रा. सरडे हा चालवत होता. दर महिना चार हजार रूपयांप्रमाणे पंचेचाळीस सदस्य पैसे भरत होते. नितीन यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पैसे लागणार होते. म्हणून त्यांनी रामदास शेडगे याला भिशीतील पैसे मागितले. रामदास याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर रामदास याने विरकर यांना, तूला व्याजाने पैसे देतो असे सांगितले. नितीन यांनी शेडगेकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले. एक वर्ष व्याज भरल्यानंतरही शेडगे त्यांना सतत व्याजाचे पैसे मागत होता.

-Ads-

दरम्यान विरकर यांना भिशी लागली. त्या भिशीतील रक्कम द्या त्यातून तुमचे पैसे देतो असे विरकर यांनी शेडगेला सांगितले. मात्र त्याने नकार देत विरकर यांना दमदाटी केली. याची तक्रार देण्यासाठी विरकर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याला गेले होते. फलटण ग्रामीण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. म्हणून विरकर तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांना भेटले होते. संदीप पाटील यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरीही फलटण ग्रामीण पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप करत विरकर यांनी शनिवारी पोलिस मुख्यालयासमोर डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुख्यालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले . आत्मदहानाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विरकर यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)