पोलिस भरतीत छातीवर जातीच्या खुणा

मध्यप्रदेशातील प्रकार; चौकशीचे आदेश 

भोपाळ – मध्यप्रदेशातील धर जिल्ह्यात नव्याने पोलिस दलांमध्ये हवालदार पदांवर भरती झालेल्या तरुणांच्या छातीवर अनुसुचित जाती, जमातीच्या उल्लेखांच्या खुणा केल्याचे नुकतेच उघड झाले. वैद्यकीय परिक्षणादरम्यान या तरुणांच्या छातीवर “एससी’, “एसटी’ आणि “ओबीसी’ अशा खुणा लिहील्याची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्‍त होऊ लागला. त्यामुळे धर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक बिरेंद्र कुमार सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांसाठी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आले असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे.

मध्यप्रदेशचे पोलिस महासंचालक ऋषी कुमार शुक्‍ला यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या मागे काहीही वाईट हेतू नसावा, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील उमेदवारांबाबत शारीरिक क्षमतेबाबत वेगवेगळे निकष आहेत. त्यामध्ये काही गैरसमजूत होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून अशा खुणा केल्या असाव्यात असे शुक्‍ला म्हणाले. या तरुणांच्या छातीवरच्या खुणा पुसून टाकण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळची घेण्याची सूचनाही केली असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)