
बुधवारी आझाद मैदानावर भव्य मोर्चा
काळगाव, दि. 26 (वार्ताहर) – राज्यातील 38 हजार पोलिस पाटील हे आजही शंभर रुपये रोजावर 24 तास गावाला बांधिल आहेत. मानधनवाढीची व स्वतंत्र कार्यालयाची अनेक वर्षापासूनची मागणी अद्यापही धूळखात पडलेली आहे.
राज्यातील महसूल व गृह खात्यांचा गावपातळीवरील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटलांकडे पाहिले जाते. 1962 पासून ते गावपातळीवर काम करत आहेत. गाव आणि परिसरात पूर्वीपासून धनापेक्षा यांना मानच जास्त मिळत असल्याने पोलिस पाटलांनी कधी मानधन वाढीची मागणी केलेली नाही. त्यामुळे 2012 पर्यंत ते केवळ आठशे रुपये महिना मानधनावर काम करीत आहेत. मात्र महागाईचा आलेख वाढत गेल्यानंतर या पोलिस पाटलांना तीस रुपये रोजावर काम करणे अशक्यप्राय बनले. अखेर 2012 मध्ये आघाडी सरकारने त्यांचे मानधन तीन हजार रुपये केले. मानधनवाढीसह पेन्शन व इतर मागण्यांसह सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी करण्यासाठी पोलीस पाटील आता मैदानात उतरणार आहेत.
यावेळी पोलिस पाटील सुभाष कदम, राहुल सत्रे, संजय कदम, सचिन भिसे आदी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा