पोलिस दलाचे तळे विसर्जनासाठी देणे अशक्‍य

उच्य न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देउन पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण
सातारा,  (प्रतिनिधी) –
अवघ्या वीस दिवसांवर येऊन टिपलेला गणेशोत्सवाचा सोहळा आला असला तरी सातारा शहरातील श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न सुटू शकलेला नाही अशातच सातारा नगरपालिकेने पोलिसांचे तळे विसर्जनासाठी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे तळे विसर्जनासाठी देता येत नाही अशी स्पष्ट भूमिका पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. त्यामुळे आता श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न बिकट बनला आहे.
सातारा शहरात पोलिस मुख्यालय पाठीमागे पोलिस वसाहत शेजारी पोलिस दलाचे आयात आकृती तळे आहे. हे तळे ऐतिहासिक असून त्यामध्ये शिलालेख मिळाले आहेत त्यामुळे त्यामध्ये यापूर्वी देखील कधी श्री गणेश विसर्जन झाले नव्हते. यामुळे सातारा नगरपालिकेने पोलिसांच्या तळे गणेश विसर्जनासाठी मागणी कशाच्या आधारे केली ? याबाबत कागदपत्र नगरपालिकेकडे मागवण्यात आली आहेत तसेच सातारा पोलीस मुख्यालयात पाठीमागे आयात आकृती असलेल्या तळ्याचे नुकतेच सुशोभिकरण केले आहे. यामध्ये यापूर्वी कधीही गणेश विसर्जन झाल्याचे संदर्भ नाहीत तसेच कधी गणेश विसर्जन झालेले नाहीत. ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी या तळ्यांकडे पाहिले जाते साताऱ्या जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून प्रेम केले आहे अनेक पर्यटक साताऱ्याला निसर्ग पाहण्यासाठी पैसे खर्च करून भेट देतात त्यामुळे सातारकर नागरिकांची जबाबदारी आहे की असे ऐतिहासिक मंदिरे, तळे, इमारती आदींची जपणूक करून हा ठेवा जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सातारा पोलिसांचे तळे गणेश विसर्जनासाठी देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका व कायदेशीर भूमिका पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मांडली.
सातारा शहर पोलिस वसाहतीचा प्रश्न पोलिस गृहनिर्माण संस्था पहात आहेत. साताऱ्यात सार्वजनिक शोचालय उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो तसेच पोवई नाका येथे उड्डाणपूल झाला असता तर लवकर काम पूर्ण झाले असते. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद आहे अशाच मंडळाना परवानगी देण्यात येणार आहे.

आज गणेश मंडळांची बैठक
जिल्हा प्रशासनाने गोडोली तळ्याचा पर्याय श्री विसर्जनासाठी दिला असला तरी शहरातील बऱ्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी या तळ्याला नकार दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी अकरा वाजता गणेश मंडळांची बैठक बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे. नगराध्यक्ष माधवी क दम मात्र या बैठकीला काही कारणास्तव गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. बैठकीत मंगळवार तळे किंवा मोती तळ्याचा पर्याय पुन्हा समोर आला तर सातारा पालिकेला नवीन प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)