पोलिस उन्नत दिन व पत्रकार दिन उत्साहात

नागठाणे – नागठाणेच्या आर्टस्‌ अँड कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित पोलिस उन्नत दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी म्हणाले, सुजाण नागरिकांमुळे दहशतवादावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. ती निर्भिड असली पाहिजे. हे निर्भिड पत्रकार नागठाणे पंचक्रोशीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

दहशतवाद विरोधी पथक प्रमुख सातारा जिल्हा पोलिस दलाचे उपनिरीक्षक मुलाणी, नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश जाधव, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सतिश जाधव, पत्रकार संघाचे नितीन साळुंखे, सचिव भोसले, संभाजी चव्हाण, शरद पवार इ. पत्रकारांचा गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. ए. जी. थोरात यांनी केले. प्रा. अभय जायभाये यांनी आभार मानले. प्रा. संदिप लोखंडे व प्रा. शौकत आतार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी पत्रकार, मान्यवर, उपस्थित होते.प्राध्यापक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)