पोलिस उन्नतीदिनी विविध कार्यक्रम

सातारा – दरवर्षी प्रमाणे यंदाही पोलिस उन्नती दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. दि.2 ते 8 जानेवारी या कालखंडात पोलिस उन्नतीदिन जिल्हाभर साजरा करण्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी आदेश दिले आहेत. यावेळी पोलिस उन्नतीदिना निमित्त जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सप्ताह साजरा केला जाणार आहे.

दि.2 जानेवारी रोजी सातारा पोलिस मुख्यालयात शस्त्र प्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी पोलिस दलाकडे असणाऱ्या विविध शस्त्रांचे प्रदर्शन केले जाणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. दि.3 रोजी जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी प्रभारी पोलिस अधिकारी संवाद साधतील.

दि.4 रोजी जिल्हाभरात विविध शाळांत निर्भया पथके सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दि. 5 रोजी जिल्हाभरातील पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. यावेळी विविध गुन्ह्यातील मौल्यवान वस्तू कायदेशीर बाबी पुर्ण करुन, तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात येतील. दि. 6 रोजी जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी त्यांच्या हद्दीतील मॉल,मोठी शॉप व गर्दीच्या ठिकाणावर सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रील करतील.

दि. 7 रोजी कराड,सातारा,फलटण येथील शहर वाहतूक शाखा वाहतूक चिन्हे व नियम यांचे मार्गदर्शन करतील. दि. 8 रोजी सातारा येथील मुख्यालयात विद्यार्थी व नागरिकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)