पोलिसाला शिवीगाळ

-युवकावर गुन्हा दाखल
-कारवाई थांबवण्यासाठी दंडेलशाही

सातारा – दुचाकी अडवल्याचा राग मनात धरून कारवाई न करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. रुपेशकुमार बाबासाहेब त्रिंबके (रा. मल्हारपेठ,सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी तक्रार दिली आहे.

मंगळवार दि.21 रोजी दुपारी सातारा शहरातील छ. शिवाजी कॉलेजजवळ बेशिस्त वाहनधारकांच्यावर कारवाई करत होत्या. त्यावेळी एमएच 11 सीपी 6591 या दुचाकीवरून हर्षद अनिल चौगुले (रा. मंगळवारपेठ, सातारा) व रुपेशकुमार बाबासाहेब त्रिंबके हे यशवंतराव चव्हाण कॉलेजकडून छ. शिवाजी कॉलेजच्या दिशेने वेगात निघाले होते. त्यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर डाळींबकर यांनी कागदपत्राची मागणी केल्यानंतर दोघांनी कागदपत्रे नसल्याचे सांगिलते. त्यावर डाळींबकर यांनी रितसर दंड भराण्याचे सांगितल्याने रुपेशकुमार बाबासाहेब त्रिंबके याने हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मी पोलिसाचा मुलगा आहे, माझे हात वरपर्यंत आहेत. तुम्ही जर माझ्या गाडीची पावती केली तर तुम्हाला माफी मागावी लागेल असा दम दिला. डाळींबकर यांनी रुपेशकुमारविरोधात तक्रार दिली असू अधिक तपास पो. नि. नारायण सारंगकर करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)