पोलिसाला मारहाण करत तरुणाचा रस्त्यातच “राडा’

मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीसमोर प्रकार

पुणे – पोलीस चौकीत कारवाईसाठी नेत असताना एका तरुणाने रस्त्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. ही घटना मंगळवार पेठेत गाडीतळ चौकीसमोर रविवारी घडली. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या तरुणास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

अजिंक्‍य राम बेलदार (26, रा. मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलीस शिपाई अमित पवार हे गाडीतळ पोलीस चौकीत बीट मार्शल म्हणून हजर असताना परिसरात तीन व्यक्ती मारामारी करत असल्याची माहिती त्यांना एका व्यक्तीने दिली. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई बिचकुले घटनास्थळी गेले. तेथे दोन व्यक्ती एका व्यक्तीला मारहाण करत असताना आढळले. त्यातील अजिंक्‍य बेलदार यास चौकीत येण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने आरडाओरडा करत “मी चौकीत येणार नाही, मी साधा गुन्हेगार नाही, तू नवीन आहेत, तू मला ओळखत नाहीस, तुझ्यासारखे लय पोलीस बघितले, चल निघ,’ असे म्हणत धमकावले. यानंतर फिर्यादीला ढकलून पळून जात असताना बेलदार याला फिर्यादेने थोड्याच अंतरावर पकडले. तेथे बेलदारने फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावत त्यांच्या मनगटाजवळ मारले. यानंतर त्याला कसाबसा पकडून पोलीस चौकीत आणण्यात आले. तेथेही त्याने गोंधळ घालत पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)