पुणे – घडलेल्या भांडणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.सराफ यांनी दिली.
उमेश सूर्यकांत साखरे (28, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, ता.मुळशी) आणि शरद तुकाराम हुलावळे (29, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी, ता. मुळशी) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई मोहन गोविंद दळवी (29) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला हिंजवडी येथील हॉटेल सनराईज समोर भांडणाचा प्रकार सुरू असल्याचा कॉल आला. फिर्यादी मोहन दळवी हे त्यावेळी रात्रपाळी ड्युटीस असताना कॉल प्राप्त झाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर उमेश साखरे याने दळवी यांना, तू येथे कशाला आला आहेस, पोलिसांचे येथे काय काम आहे, असे म्हणत त्यांना निघून जा, नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. तर शरद हुलावळे याने दळवी यांना धक्का बुक्की करून ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आले. त्यावेळी उमेशकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र परवाना नाही. परंतु, त्याने गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याने त्याच्याकडे कोणते बेकायदेशीर शस्त्र आहे का, याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)