पोलिसानेच केला तक्रारदाराचा विनयभंग

पिंपरी – सहाय्यक पोलीस फौजदाराने तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी संबंधित फौजदाराचे तातडीने निलंबन करण्यात आले.

रामनाथ पालवे असे निलंबीत झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव असून त्याच्या विरोधात पिडीत महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. तिचे पतीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे संबंधित महिला स्वतःच्या मुलाला घेऊन तक्रार देण्यासाठी बुधवारीरात्री अकरा वाजण्याच्या सुमारास साने चौकीत गेली होती. त्यावेळेस पालवे याने या महिलेची जुजबी तक्रार नोंदविली. त्यानंतर तिने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मध्यरात्री पालवे याने संपर्क करून अश्‍लिल बोलून महिलेचा विनयभंग केला. संबंधित महिला आणि राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी संबंधित सहायक फौजदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पालवे याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेडछाड करणाऱ्या पालवे यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)