पोलिसाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाने केली आत्महत्या

लातूर : पोलिसाच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील तुपडी या भागात झालेल्या एका अपघातप्रकरणी याच गावातील रिक्षाचालक  राजू अभंगे याचे नाव गोवण्यात आले होते. यासाठी त्याच्याकडून पोलिसांनी पैशाची मागणीही केली होती. यामुळे हतबल झालेल्या राजूने काल (मंगळवार) दुपारी साडेचारच्या दरम्यान झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

यावेळी त्याच्याकडील सुसाईड नोटमधून या घटनेचा उलगडा झाला. या सुसाईड नोटमध्ये त्यानं स्पष्ट लिहलं आहे की, ‘पोलीस कर्मचारी जाधव यांनी पैशासाठी लावलेल्या तगाद्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.’ याप्रकरणी पोलीस मुख्य दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप राजूच्या नातेवाईकांनी केला आहे. का


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)