पोलिसांनी अतिक्रमणे हटवली

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात कारवाई :  खोकी जप्त

सातारा,दि.9(प्रतिनिधी)  – शहारातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील अतिक्रमणे पोलिसांनी हटवली. यावेळी महामार्गाच्या ब्रिजखाली असलेली अनाधिकृत खोकी पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई सातारा शहरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
महामार्गाच्या ब्रिजखाली असलेल्या अनेक टपऱ्या या अनधिकृत होत्या. तसेच यातील काही टपऱ्यात जुगार अड्डा चालवला जात असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे वारंवार आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी बुधवारी दुापारी कारवाई केली. पोलिसांनी ब्रिजखाली असलेल्या सुमारे दहा टपऱ्या यावेळी हटवल्या. दरम्यान कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथक, सातारा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी असा तगडा बंदोबस्त तैनात केला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)