पोलिसांना दोनशे रूपयांपेक्षा अधिक रक्कम बाळगण्यास मनाई

भ्रष्टाचार रोखण्यासाठी अजब उपाय
सिमला – पोलिसांमधील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांनी पोलिसांसाठी अजब आदेश जारी केला आहे. कोणत्याहीं पोलिसाने ड्युटीवर असताना खिशात दोनशे रूपयांपेक्षा अधिक रोकड बाळगू नये असा आदेश त्यांनी जारी केला आहे.

या जिल्हयातील पोलिस चेकपॉईन्टवर बाहेरील राज्याकडून येणाऱ्या पर्यटकांकडून पोलिस पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त या चेकपाईन्टवर कार्यरत असलेल्या पोलिसांपुरताच मर्यादित आहे असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-

हिमाचलातील अनेक तीर्थस्थळावर पंजाबच्या बाजूने असंख्य भाविक हिमाचलात येत असतात. त्यांच्याकडून चेक पॉईन्टवर हे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही उपाययोजना करण्यात आली आहे. तेथील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने आज आपल्या खिशात नेमके किती पैसे आहेत याची नोंद स्टेशन डायरीत करणे आवश्‍यक करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)