पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अटकेत

बोरगाव, दि. 19 (प्रतिनिधी) – सासपडे (ता.सातारा) येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व बलात्कार प्रकरणी सुमारे 13 महिने बोरगाव पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितास अखेर पोलिसांनी सासपडे गावातून रविवारी ताब्यात घेतले. अक्षय शहाजी निकम (वय 28, रा. सासपडे, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.

जिल्हा न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2016 मध्ये सासपडे येथील एका अल्पवयीन मुलीला घेऊन अक्षय निकम हा पळून गेला होता. या अनुषंगाने सादर मुलीच्या आईने बोरगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी सदर अल्पवयीन मुलगी बोरगाव पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तीने दिलेल्या जबाबानुसार अक्षय निकम याच्या विरोधात अपहरणाबरोबरच बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून अक्षय निकम हा पोलिसांना गुंगारा देत होता.

रविवारी सदर संशयित हा सासपडे गावात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस जवान समाधान राक्षे व साळुंखे यांनी सासपडे येथे पाळत ठेवून अक्षय निकम याला ताब्यात घेतले. त्याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)