पोलिसांना करायचा आहे जप्त केलेल्या डेटामध्ये हस्तक्षेप

अॅड. गडलिंग यांचा न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात आरोप

पुणे – एल्गार परिषदेच्या अनुषंगाने आरोपींकडून जप्त करण्यात आलेला इलेक्‍ट्रॉनिक डाटा नेमका किती, कशा प्रकारचा आणि शेवटी कधी वापरण्यात आला, याबाबत अधिकृत रिडिंग असलेली कोणत्या एकाही छाप्याची हॅश व्हॅल्यू (सिक्‍युरीटी की) काढली नाही. कारण त्यांना संबंधित डेटामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी त्यात अंर्तभूत करावयाच्या होत्या, असा आरोप संशयित आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी सोमवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केला.

कोरेगाव-भीमा शौर्य प्रेरणा अभियानचे फेसबुक पेजवरील हॅश व्हॅल्यू पोलिसांनी काढली. कारण, त्यावर आक्षेप घेता येऊ शकला असता. पण जप्त केलेल्या सीडी, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क यांची हॅश व्हॅल्यू काढण्यात आली नाही. त्यामुळे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केलेला तपास संशयास्पद असून त्याला कोणताही आधार नसल्याचा दावा त्यांनी केला. एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास करताना सीपीआय माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचे कारणावरून देशभरात अनेक जणांच्या घरी छापे टाकून सायबर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त केला होता.

गडलिंग स्वत:चा जामीन अर्जावर युक्‍तिवाद करताना म्हणाले, वेगवेगळया छाप्या दरम्यान जप्त करण्यात आलेल्या डेटाच्या क्‍लोन कॉपी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्याचे पोलीस सांगतात तर, कधी अद्याप काही कागदपत्रे मिळवयाचे असल्याचे स्पष्ट करतात. मी नक्षलवाद्यांच्या विरोधातील केसेस चालवतो. त्यामुळे मला पोलिसांनी सदर गुन्ह्यात अडकवले असून अनेकवेळा धमकावले आहे. गडचिरोली येथील साईबाबाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मला केस चालवू नको म्हणून धमकावले होते आणि आजही तेच सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)