पोलिसांच्या सहकार्याने गावाची सुरक्षा आबाधित राखावी

पांगारी : युवकांना पोलीस मित्र ओळख पत्रांचे वितरण करताना सपोनि. तृप्ती सोनवणे व इतर.

सपोनि तृप्ती सोनवणे यांचे आवाहन, पांगारी येथे ओळखपत्रांचे वाटप
पाचगणी, दि. 12 (प्रतिनिधी)- समाजातील विपरीत व अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी गावातील युवा तरुणवर्गाने पोलीस मित्र, ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून आपल्या गावाची सुरक्षा पोलिसांच्या सहकार्याने अबाधित राखावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी केले.
पांगारी, ता. महाबळेश्वर येथे ग्रामसुरक्षा दल, निर्भया पथक पोलिस मित्र याविषयी जनजागृती व पोलीस मित्र तसेच ग्रामसुरक्षा दल यांना ओळख पत्रांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सर्कल व्ही. ए. ढगे, ग्रामसेवक राजेंद चव्हाण, तलाठी रुपेश शिंदे, बिटअंमलदार विजय मुळे, नंदकुमार कुलकर्णी, सरपंच मंदा पांगारे, सदस्य गणेश पांगारे, पोलीस पाटील मनीषा पांगारे, नेहरू युवा अध्यक्ष अनिल पांगारे, सागर पांगारे, रवींद्र पांगारे, संदीप पांगारे, मनोहर उंबरकर, दिलीप पांगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
तृप्ती सोनवणे म्हणाल्या की, गावांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनाच्यावतीने गावपातळीवर ग्रामसुरक्षा दल निर्माण करण्यात आली आहेत. याचा मुख्य उद्देश सुरक्षेच्या दृष्टीने गावात शांतता प्रस्थापित व्हावी. यामार्फत विविध उपाय योजना राबविल्या जातात. आपल्या गावाची सुरक्षा आपल्या हातात आहे. ग्रामस्थांनी उंबरी गावात घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्‍त केला. आपल्या मुलांची जबाबदारी ही सर्वस्वी आपली आहे. लहान मुलांचे म्हणने ऐकूण घेतले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांना मोबाईलच्या वापरापासून दूर ठेवले पाहिजे. आजुबाजुच्या घटनांबाबत दक्ष राहिले पाहिजे. अनुचित घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित सरपंच पोलीस पाटील यांच्या सांगितले पाहिजे.
गावातील तरुणांना पोलीस मित्र बनवून त्याना ओळख पत्र वितरित करण्यात आली व याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही शेवटी त्या म्हणाल्या. या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन महेंद्र पांगारे, आभार जानू पांगारे यांनी मानले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)