पोलिसांच्या समर्थनार्थ भांगरेचा मूकमोर्चा

आ. पिचड यांचा निषेध; खोटे गुन्हे परत घेण्याची मागणी
राजूर – पोलिसांच्या समर्थनार्थ भाजप नेते अशोक भांगरे व त्यांच्या समर्थकांनी राजूर गावातून मूकमोर्चा काढला. ग्रामपंचायत, जुना नाट्य चौक, संताजी चौक, मुख्य बाजारपेठ, गणपती मंदिर असे मार्गक्रमण करत दत्त मंदिरातील सभागृहात येऊन या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात भांगरे व अन्य वक्‍त्यांनी टीका केली.
गणपती विसर्जनाच्या सायंकाळी दोन गटांत वाद झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी दोन्ही गटांचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु राजूर पोलीस ठाण्याच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कादरी यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व
तहसीलदार मुकेश कांबळे यांनी काही वेळात घटनास्थळी भेट दिली. कांबळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर एका गटाच्या गणपतीची आरती करून विसर्जन मार्गाकडे रवाना केल्यावर हा वाद मिटला; परंतु दुसऱ्या गटाच्या लोकांनी गणपती विसर्जन मार्गावर उभा केल्याने जमाव पांगवण्यासाठी
पोलिसांनी लाठीमार केला. त्यात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते. त्यांनतर पोलिसांनी रात्रभर तपास करून सुमारे पन्नास लोकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. सहा आरोपी अटक केले होते.
पोलिसांच्या कारवाईबाबत आ. पिचड यांनी पोलिसांच्या कारवाईवरच आक्षेप घेतला. भांगरे यांची सुपारी घेऊन पोलिसांनी हा प्रकार घडवून आणला, असा आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून भांगरे यांनी आठवडे बाजारातून पोलिसांच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढला. शिवाजी धुमाळ, अमित भांगरे, काशिनाथ साबळे, शरद कोंडार, मंगळा पटेकर, लालू देशमुख, मुरलीअण्णा भांगरे, धनंजय संत, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, पंचायत
समिती सदस्य अलका अवसरकर व भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुमाळ यांनी आपल्या शैलीत पिचडांवर टीका केली. भांगरे यांनी, “गेल्या तीस वर्षांच्या राजकारणात कधी कुणावर खोटे गुन्हे दाखल केले नाही. जाणीवपूर्वक पोलिसांना
दोषी ठरविण्याचे काम होत आहे,’ अशी टीका केली. दोन आदिवासी पोलिसांना गंभीर दुखापत झाल्याचा निषेध आमदारांनी केला नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या निर्दोष लोकांवरचे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)