पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी ?

पिंपरी – एका बाजुला पोलीस आयुक्त, “”पोलिसांना मित्र समजा, इथून पुढे तुम्ही पोलिसांकडे नाही तर पोलीस तुमच्याकडे येतील”, असे खसा खरडून सांगत आहेत. मात्र त्यांचेच पोलीस अधिकारी फिर्यादींचा अवमान करणे, त्यांना ताटकळत बसवणे असे प्रकार करत आहेत. त्यावर कडी करत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी असा प्रश्‍न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.

याबाबतची हकीकत अशी की, युवराज माने यांच्या मोटारीची तोडफोड करण्यात आली होती. याबाबत तक्रार देण्यासाठी ते पिंपरी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी सहायक निरीक्षक सतीश माने व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी ते आरोपी आमच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका, नाही तर तुलाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करू, अशी धमकी देत बेदम मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी भाजपचा कार्यकर्ता असूनही मला पोलिसांकडून अशी वागणूक मिळाली तर सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारची वागणूक देत असतील, असा सवालही माने यांनी केला. तसेच आपल्याला मारहाण करणाऱ्यांना पोलीस खात्यातून निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्यापुढे केवळ मोजके मनुष्यबळ हा एकच अडथळा नाही तर बेशिस्त मनुष्यबळ हे सुद्ध एक आव्हान आहे.

असे काही घडलेच नाही – पोलीस
माने हा दरोडा आणि तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्या साथीदाराबाबत माहिती हवी असल्याने आम्ही त्यांची चौकशी केली. मात्र कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. तसेच गुन्हा दाखल झाल्याबरोबर आम्ही सर्व आरोपींना अटक केली आहे. यामुळे माने यांच्या आरोपात तथ्य नाही, असा खुलासा पिंपरी पोलिसांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)