पोलिसांच्या दक्षतेमुळे वाहनाला मिळाला मूळ क्रमांक

पुणे – वाहन वितरकाच्या चुकीमुळे वाहनाला चुकीची नंबरप्लेट लागली गेली होती. मात्र, नाकाबंदीवरील पोलिसांच्या दक्षतेमुळे ही बाब उघडकीस येऊन वाहन मालकाला त्यांच्या गाडीचा मूळ क्रमांक मिळाला.

नाकाबंदीदरम्यान दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज अभंग व पोलीस शिपाई भोसले, प्रवीण मिसाळ, किरण रासकर हे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी एक संशयित दुचाकी थांबवून विचारपूस केली. वाहन मालकास चौकशी केली असता, त्याने योग्य ती माहिती दिली नाही. यामुळे अभंग यांनी त्यांच्याकडील मोबाइल अॅपचा वापर करुन वाहन मालकाचे नाव व पत्ता शोधला. यावेळी गाडी “अॅक्‍टिव्हा’ व लाल रंगाची असल्याचे आढळले. गाडीच्या नोंदणीबाबत संशय आल्याने त्यांनी ई-चलन अॅपवर क्रमांक टाकला असता, त्यावर दोन वेळा कारवाई झाल्याचे व गाडीचा फोटो व नंबर दिसला. ई-चलनमध्ये संबंधित गाडी “होंडा नवी’ अशी होती. दोन्ही वाहनांचे नंबर एकच असल्याने दुचाकी चालकास दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर चॅसीवरुन क्रमांक काढला असता, त्यात एक अंक वेगळा होता. यामुळे संबंधित गाडीचे मालक शहा यांना बोलावून कागदपत्रे तपासण्यात आली. यामुळे शहा गोंधळून गेले. “ज्या शोरुमधून गाडी घेतली होती, त्यांनी नंबरसह गाडी दिल्याने आम्ही तिच्या कागदपत्रावरील नंबर पाहिला नाही,’ असे शहा यांनी सांगितले. “मोटार व्हेइकल अॅप्समुळे वाहन चोरीला आळा बसेल आणि चोरी करणारे हे पोलिसांच्या कामगिरीमुळे सापडतील,’ असे सांगत शहा यांनी पोलिसांचे आभार मानल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)