पोलिसांच्या तत्परतेमुळे तो पोहोचू शकला इच्छितस्थळी

पुणे – कामानिमित्त परदेशी असलेल्या तरुणाच्या आईचे निधन झाल्याने त्याला पुण्यात यावे लागले. यानंतर येथील कार्यक्रम पूर्ण करून पुन्हा तत्काळ परदेशी जाणे गरजेचे होते. अशावेळी पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे तो वेळेत सर्व प्रक्रिया करू शकला. याबाबत शौकत सय्यद युसुफअली यांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पुण्यातील लुल्लानगर येथील सहानी-सुजेन पार्क येथील रहिवासी असणाऱ्या 80 वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने 10 सप्टेंबर रोजी मयत झाली. यावेळी महिलेचा मुलगा उमर बलूच (पाकिस्तानी नागरिक) हा नोकरीसाठी कुवेत येथे होता. तो दि.12 सप्टेंबर रोजी पुण्यात आला. अंत्यविधी करून तो दि.13 रोजी परतीच्या प्रवासाला निघाला. यावेळी पुणे पोलिसांनी त्याला पासपोर्ट व्हेरिफिकेशन तसेच आदी कामांसाठी तत्परतेने मदत केली. कार्यालयातील महिला पोलीस रुपाली माळी, राणी केकाण यांनी तत्परता दाखवित मदत केल्याने तो इच्छितस्थळी पोहोचू शकला. यामुळे शौकत सय्यद युसुफअली यांनी पोलिसांप्रती त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)